गोष्टी स्मार्ट फोनच्या (basics of smart phone in marathi)


सध्या सर्वच लोक स्मार्ट फोनचा उपयोग करायला लागले आहेत. स्मार्ट फोन आणि साधा फोन ह्यात खूप फरक असतो. स्मार्ट फोनची शक्ती मुख्यतः त्याच्या ऍप मध्ये असते. कुठला हि नवीन ऍप download करून मोबाइल मध्ये नवीन प्रोग्रॅम आणता येतात आणि म्हणूनच स्मार्ट फोनचा उपयोग वाढत असतो. पण काही महिने पुष्कळ उपयोग केल्या नंतर फोन थोडा म्हातारा वाटायला लागतो. ऍप्स पटकन उघडत नाही, विडिओ प्ले होता होता थांबतात, इंटरनेट चे पेजेस उघडायला खूप वेळ लागायला लागतो. हे सगळं खरं तर फोन म्हातारा झाला म्हणून नसतं. हा फोन ची नीट सांभाळ ना केल्या मुले आलेला थकवा असतो. इथे सांभाळ म्हणजे फोन ला जपून, महागड्या कव्हर मध्ये ठेवणं नाही. जर बाल संगोपना सारखे फोन संगोपन केले तर असले त्रास होणार नाहीत. आणि झालेच त्या खूप सोप्या रीती ने दूर करायचे पुष्कळ मार्ग असतात.
 स्मार्ट फोन आता महाराष्ट्राच्या कोन्या कोपरात शिरला आहे. मराठी कीबोर्ड आल्याने  फोन वापरायला इंग्लिश ची गरज हि विशेष राहिली नाही. पण फोनची काळजी कशी घ्यावी, किंवा फोन वापरताना साध्या सोप्या अडचडी आल्या तर काय करायचा याची माहिती मराठीत विशेष आढळत नाही हेच हे ब्लॉग लिहिण्याचं प्रयोजन.

इथे स्मार्ट फोन बद्दल काही माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. शक्य तेवढ्या सोप्या भाषेत विशेष technical शब्द ना वापरता ते आपण पुढे आपण पाहणार आहोत. स्मार्ट फ़ोन म्हणजे साधा फोने आणि कॉम्पुटरच मिश्रण. कॉम्पुटर जे प्रमुख दोन उपयोग. पहिला मनोरंजना साठी विडिओ, गाणी, फोटो, ई-मेल, न्यूज, सोशल मीडिया इत्यादी. दुसरा वैज्ञानिक अनुसंधान (technical research). आपल्याला जास्ती करून सायबर कॅफे किंवा घरी दिसतो तो कॉम्पुटर मनोरंजना साठीच असतो. दुसऱ्या प्रकारच कॉम्पुटर हि दिसायला वेगळा नसतो पण त्यात गणन क्षमता (प्रोसससिंग पॉवर) आणि मेमरी जास्त असते. शिवाय त्यावर रिसर्च करता लागणारे काही विशेष प्रोग्रॅमही असतात. स्मार्ट फोन म्हणजे साधा फोन + मनोरंजनासाठी उपयोगी पडणारा कॉम्पुटर.
 पण मग तुम्ही लगेच विचाराल कि मग स्मार्ट फोन मुले मनोरंजनासाठी बनवल्या जाणाऱ्या कॉम्प्युटराची विक्री कमी झाली असेल. ह्याचे उत्तर 'हो' असेच आहे. असल्या कॉम्प्युटर्सच्या किंमतीही खाली आल्या आहेत. तरी काहि बाबतीत फोन कॉम्पुटरचा पर्याय नाही होऊ शकला. उदाहरण CD किंवा DVD स्मार्ट फोन वर लागू शकत नाही. कॉम्पुटरची स्क्रीन मोठी असते आणि टायपिंग सोयीचे असते.

आता आपण स्मार्ट फोनच्या विभिन्न अंगांबद्दल जाणून घेऊ.

१. प्रोसेसर (संगणक) :  प्रत्येक स्मार्ट फोन मध्ये एक चिप असते जी त्या फोनचा मेंदूचे काम करते. प्रोसेसर वर फोनच सगळं प्रबंधन संभायला एक मुख्य प्रोग्रॅम सतत चालत असतो त्याला ऑपरेटिंग सिस्टिम म्हणतात. फोनच कुठलं हि काम मग ते विडिओ बघणं असो कि कोणाशी बोलायचं असो या ऑपरेटिंग सिस्टिम ने  नियंत्रित केलं जातं.

२. मेमरी (स्मरण क्षमता): स्मार्ट फोन मधली मेमरी ३ प्रकारे उपयोगास येते.
  1. डेटा (फोटो, विडिओ, गाणी): आपण फोन वर जे जे वाचतो, बघतो किंवा ऐकतो ते फोन वरच्या मेमरी वर स्टोरे केलं जातं. विडिओ सर्वात जास्त मेमरीच उपयोग करतात, त्यानंतर ऑडिओ मग फोटो आणि सर्वात नंतर मेसेज जे सर्वात कमी मेमरी वापरतात. पुष्कळ महिने उपयोग केल्यामुळे फोन जी उर्वरित मेमरी कमी होत जाते आणि फोन पूर्वीसारखा चालत नाही. 
  2. ऍप/ प्रोग्रॅम: कुठला हि ऍप किंवा प्रोग्रॅम फोने वॉर डाउनलोईड आणि इन्स्टॉल केल्या वर तो फोनच्या मेमरीचा काही भाग अडवून ठेवतो. म्हणूनचं अनावश्यक ऍप्स वेळोवेळी delete करावे. 
  3.  run time memory : कुठला हि प्रोग्रॅम रन करताना फोनच्या प्रोसेसरला तात्पुरती मेमरी हवी असते. मेमरी किती हवी हे कुठला प्रोग्रॅम आहे आणि कितीवेळ रन केला जातो ह्यावर अवलंबून असते. कुठला मोठा हिशोब करताना आपण पाटी पेम वर काही आकडेमोडी करतो आणि मग मिटवून देतो कॉम्पुटरहि तसेच करतो पण त्याला जर पाटी वर जागा (मेमरी) सापडली नाही तर तो जागा शोधण्यात वेळ घालवतो आणि आपल्याला आपला फोन स्लो झाला आहे असे वाटायला लागते. 
३. इंटरफ़ेस: इंटरफेसेस दोन प्रकारचे असतात एक ज्यांनी तुम्ही फोनची संवाद करता आणि दुसरा ज्याने १ फोने दुसरा फोनशी किंवा device शी बोलू शकतो. कीपॅड, स्क्रीन, माईक, स्पीकर हे सगळे फोन आणि तुम्हाला जोडतात तर वायफाय, ब्लूटूथ इत्यादी एका फोन ला दुसऱ्या device बरोबर जोडतात.



तर तुमच्या फोनचा मेंदू आहे प्रोसेसर, आत्मा आहे ऑपेरेटिंग सिस्टिम, मेमरी स्मरण शक्ती आहे. इंटरफेस इंद्र्यांचे काम करतात आणि त्याचे आवरण, स्क्रीन बॅटरी इत्यादी शरीर आहे. या पंचतत्वांने फोन बनतो आणि फोन मधला कुठला हि बिगाड या पंचतत्वांच्या विकारांनी होतो. पुढे आपण ह्या बद्दल सविस्तर बघणार आहोत.
























Comments